corona, coronavirus, Covid 19 deaths 
देश

मानवी मृतदेहावरील अमानवी कृत्याची SC ने घेतली दखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: दिल्लीतील रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांना वाईट पद्धतीने हाताळण्यात येत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. याची दखल सर्चोच्च न्यायालयाने घेतली असून यावरुन दिल्ली सरकारला फटकारले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीने हाताळण्यात येत आहे, असे न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवली आहे. तसेच केंद्र सरकारकडे या प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांना मिळणारी वागणूक आणि रुग्णांच्या मृतदेहांची होणारी हाताळणी यावरुन न्यायालयाने दिल्ली सरकारला खडेबोल सुनावले आहेत. न्यायमूर्ती संजय किशन कौल, एम.आर.शाह आणि अशोक भूषण यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. दिल्लीतील कोविड-19 चाचणींची संख्या कमी का झाली आहे, असा सवालही न्यायालयाने विचारला आहे. मुंबईमध्ये दररोज 16 ते 17 हजार चाचण्या होत असताना दिल्लीत दररोज 7 हजार चाचण्या का होत आहेत, असा जाबही न्यायालयाने विचारला. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांवरही ताशेरे ओढत रुग्णालयांची अवस्था सुधारण्यास सांगितलं आहे.

राजधानीत काही ठिकाणी मृतदेह एकाचवेळी जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कचऱ्याच्या डब्यामध्येही मृतदेह आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात येत आहेत. मृतांना प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे, असं न्यायमूर्ती अशोक भूषण म्हणाले आहेत. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासंबंधी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे, असं असताना त्याचे पालन का केले जात नाही, असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारांना विचारला आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात कोविड-19 चाचणी करायला हवी. पण तसं होताना दिसत नाही. चाचण्या न करणं हा पर्याय नाही. कोरोनाबाबत सध्या काय परिस्थिती आहे हे नागरिकांना कळणं आवश्यक आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच मृतांपेक्षा जे जिवंत आहेत त्यांची आम्हाला जास्त काळजी आहे. त्यामुळे रुग्णालयांची अवस्था सुधारा आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या घ्या, अशी पुष्टी न्यायालयाने जोडली आहे.

दरम्यान, भारतात कोरोना महामारी भयंकर रुप धारण करत असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी 11,455 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा आतापर्यंतचा एकादिवसातील सर्वाधिक आहे. यासोबतच देशाने एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत 3 लाखाचा आकडा पार केला आहे. सध्या भारतात 3 लाख 8 हजार 993 कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत 8,884 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक; राष्ट्रीय हरित लवादाकडून २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT